आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेकिंगसोबतच जंगलाची स्वच्छता करणारे ‘युथ होस्टेल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(युथ होस्टेलच्या ट्रेकिंग पदभ्रमण मोहिमेत सहभागी महिला युवती.)
अमरावती- युथहोस्टेलची अमरावती शाखा दरवर्षी उन्हाळ्यानंतर तसेच हिवाळ्यात ट्रेकिंगचे आयोजन करीत असते. पदभ्रमणासोबतच जंगलाची स्वच्छता करणे, असा उपक्रमही ते राबवत असतात.
ट्रेकिंगमध्ये सहभागी प्रत्येक सदस्याने आपल्याकडे काही लहान प्लास्टिकच्या पिशव्या ठेवाव्यात. चालताना वाटेत जो कचरा सेल तो प्रत्येकाने उचलूनतोस्वत:जवळील पिशवीत ठेवायचा आणि नंतर मोठ्या बॅगमध्ये टाकायचा, असे निर्देश ट्रेकिंग सुरू होण्यापूर्वी सर्वांना दिले जातात. यामुळे जंगलही स्वच्छ होते, अनावश्यक कचरा उचलला गेल्यामुळे निसर्ग पर्यावरणाची हानीही होत नाही. जिल्ह्यातील सालबर्डी, चिखलदरा, गाविलगड, कलालपुंड, आमझरी, आमाडोह, झाडखोरा, बुतखोर, कोरखेडी, कुंडबोरखेडी, चिकाटी, माखला, सेमाडोह आणि नरनाळा या ट्रेकिंगच्या ठिकाणावरून आजवर बराचसा कचरा गोळा करून तो शहरात आणला गेला. उन्हाळ्यात सहल पिकनिक म्हणून अनेकजण कुटुंबासह थंड हवेच्या ठिकाणी किंवा जंगलात जात असतात.

चाॅकलेटचे कव्हर २० वर्षे मुरत नाही
एकलहान चाॅकलेटचे कव्हर जर जंगलात टाकले, तर ते २० वर्षे मातीत मुरत नाही. ते ज्या ठिकाणी गाडले जाते तेथे गवत किंवा झाडही उगवत नाही. मग, जर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर जंगलात टाकण्यात आला, तर त्यांचे सौंदर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. स्वच्छ प्लास्टिकमुक्त जंगल आपल्या पदरात भरभरून दान टाकत असते.
पर्यटनस्थळी कचरा टाकू नये
सहलिकंवा पिकनिकदरम्यान कचरा किंवा प्लास्टिक टाकून परिसर अस्वच्छ करता तो स्वत:सोबत घेऊन यावा. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. अॅड.अतुल भारद्वाज, अध्यक्ष युथ होस्टेल, अमरावती .