आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribal Department Hostel,Latest News In Divya Marathi

अप्पर आयुक्तांच्या कक्षात ठिय्या;विद्यार्थ्यांचा आदिवासी वसतिगृहातील सुविधा योग्य नसल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करून सोमवारी (दि. 28) आदिवासी अप्पर आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या ठोकून मागण्या पूर्ण होईपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका सहभागी 50-60 विद्यार्थी व युवा सेनेने घेतली.
युवा सेनेचे शहराध्यक्ष पराग गुडधे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ऑगस्ट 2012 पासून आजपर्यंत अत्यावश्यक सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी पाच आंदोलने करण्यात आलीत. मात्र, त्याची दखल घेतली नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, भोजन, इमारत या महत्त्वाच्या मूलभूत सुविधा निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. बारा वाजतापासून कक्षात बसलेले विद्यार्थी सायंकाळी साडेपाचपर्यंत कक्षातच बसलेले होते. पराग गुडधे यांनी आदिवासी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा सुरू केली होती. मागण्या मान्य न झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना घेऊन युवा सेना आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी गोपाल राणे, बंडू देशमुख, विजय डाफरे, प्रमोद धनोकर यांच्यासह आदिवासी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी उपस्थित होते.