आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी एकवटले आदिवासी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - धनगरसमाजाला अनुसूचित जातीत (एसटी) समािवष्ट करून त्यांना त्या संवर्गाचे आरक्षण देण्याच्या संभाव्य शासकीय हालचालींचा आदिवासी समाजाने शनिवारी तीव्र शब्दांत निषेध केला. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला.

महापौर वंदना कंगाले, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. वसंत पुरके मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. एसटी बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानातून दुपारी दीड वाजताच्या सुमारास या मोर्चाचा प्रारंभ झाला. त्यानंतर रेल्वे स्टेशन, इर्विन चौक कॅम्प मार्गे हा मोर्चा जिल्हा कचेरी आणि विभागीय आयुक्तालयावर पोचला.आदिवासींच्या आरक्षणाला हात लावू नका, धनगरांना एसटी संवर्गात घुसवू पाहणाऱ्या राज्य शासनाचा निषेध असो, शरद पवार मुर्दाबाद आदी घोषणा देत ही मंडळी पुढे जात होती. आंदोलनात आदिवासी समाजाच्या विविध संघटनांचे हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. पुरके, काळे महापौरांनी जिल्हािधकारी कार्यालयापासून आंदोलनात पुन्हा सहभाग घेतला. संवर्धनासाठी आवाज बुलंद करण्यात आला.

परंपरागतवाद्य, नृत्यही!
मोर्चातकेवळ घोषणाच नव्हत्या. तर आदिवासींच्या परंपरागत वाद्य नृत्याचाही सहभाग होता. आदिवासी पेहरावातील नृत्य, गीत-संगीताचीही आंदोलनात रेलचेल होती. म्हणूनच या अनोख्या आंदोलनाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

कायद्याची पायमल्ली नको
मोर्चािवभागीय आयुक्त कार्यालयावर पोचल्यानंतर एका सभेत रुपांतरित झाला. यािठकाणी भाषण करताना प्रा. वसंत पुरके यांनी आरक्षण आदिवासींच्या कायदेशीर प्रवासाचा धावता आलेख मांडला. ते म्हणाले, कोणत्या जाती-जमातीला आरक्षण द्यावे यासाठी काही मापदंड ठरवून देण्यात आले आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी बघता कायद्याची पायमल्ली होण्याची शक्यता आहे. कोणाचेही नाव घेता दिग्गजांनी असे करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.