आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला झाला प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्रराज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. दाेन फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रात्यक्षिक परीक्षा १८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहेत. व्यावसायिक, सर्वसाधारण आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी आवश्यक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा या कालावधीत घेतली जाणार आहे. अमरावती विभागीय मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या लिखित परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आरंभ होणार आहे. तत्पूर्वी व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणे गरजेचे आहे. प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर आरंभ झाल्या आहेत.

विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, विद्युत परीक्षण यांसह विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. वाणिज्य शाखा एमसीव्हीसी शाखेतील विविध व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून त्यांच्या सोयीने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.