आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑन बाइक’ मोबाइलवरून दोनगटांमध्ये वाद, आठ जणांना घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वाहनचालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या युवकाला एकाने हटकल्यावरून उद्भवलेल्या वादातून युवकाला चाकू मारल्याची घटना रविवारी सायंकाळी जयस्तंभ चौक मार्गावर घडली.
रशीद खान हिदायत खान (४८ रा. तारखेडा, अमरावती) हे त्यांच्या मुलासह सायंकाळी शहरात आले होते. प्रतीक प्रेमचंद गुप्ता दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलत होता. रशीद यांनी त्याला गाडी उभी करून बोल, असे हटकले. त्यातून वाद झडला. प्रतीकने फोन करून मित्रांना बोलावले. त्याचे मित्र तेथे पोहोचले. त्यामुळे रशीद खान यांच्या मुलाने चाकू काढला प्रतीकचा मित्र आतिश मदनलाल साहू (२६) याला मारला. वाद कोतवाली पोलिसांत पोहोचला. उपायुक्त बी. के. गावराने, एसीपी अशोक कळमकर यांनी तातडीने कोतवाली ठाणे गाठले. रशीद खान प्रतीक साहू या दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी पेालिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांना ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणी प्रतीक रशीद खान यांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतीक आणि त्याच्या पाच मित्रांना रशीद खान अन्य एक, असे आठ जणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. दिलीपइंगळे, ठाणेदार,शहर कोतवाली.