आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख शेतकऱ्यांची बँक खाती कोरडीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत अाहेत, दुसरीकडे अमरावती विभागातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळालीच नसल्याचे वास्तव शासकीय आकडेवारीतून पुढे आले आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची अद्यापही प्रतीक्षाच आहे. सरकारी नियमांप्रमाणे मिळणाऱ्या या मदतीची शेतकरी मोठ्या आशेने वाट बघताहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली आहे.
आतापर्यंतच्या पाहणीनुसार पीक घरात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र, मागील तीन महिन्यांत अचानक आत्महत्या वाढल्या आहेत. दुर्दैवाने नैसर्गिक आपत्तीत शेतकरी भरडले जाताहेत. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र, बँक खात्याचे तपशील मिळत नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने दुष्काळ मदतनिधीचे वाटपच बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पन्नास पैशांच्या आत पैसेवारी आल्याने वऱ्हाडातील ७,२४१ गावांत राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती घोषित केली होती. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांत असलेल्या १९ लाख ८१ हजार ७६८ बाधीत शेतकऱ्यांपैकी ३१ मार्चपर्यंत १७ लाख ६८ हजार २५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी केला, मात्र दोन लाख १३ हजार ५११ शेतकऱ्यांना अद्यापही मदत निधी मिळाला नाही.

मेमध्येखरिपाची तयारी : पुढीलमहिन्यापासून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू होतोय. बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळवीचा हा आहे. मात्र, पदरी पैसाच नसल्याने शेतकरी आता पुरते हतबल झाले आहे.

६९ कोटी रुपये परत
विभागाकरिता एकूण मिळालेल्या १००२ कोटींच्या मदत निधीपैकी ६९ कोटी ४९ लाखांचा निधी राज्य सरकारकडे परत पाठवला आहे. यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक २३ कोटींचा निधी परत पाठवला, तर त्या खालोखाल अकोला २० कोटी, बुलडाणा १५ कोटी, अमरावती कोटी आणि वाशीमने कोटी सरकारकडे परत केले. दुष्काळ मदतनिधी वाटपात वाशीम आणि अमरावती जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.