आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two People Arrested For Businessman Murder Issue

व्यापारी खून प्रकरणात दोघांना अटक, रक्कम डायरी जप्त करण्याचे प्रयत्न सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा येथील जुनीवस्ती परिसरात दहा दिवसांपूर्वी घडलेल्या उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी मृतकाच्याच गावाकडील व्यवसायासाठी बडनेरातसोबतच राहणाऱ्या दोन मित्रांना अटक केली आहे.

रशीद बाबुद्दीन कुरेशी (४८) आणि पवन सत्पाल ठाकूर (३८ दोघेही रा. मथुरा) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सात डिसेंबरला पहाटे जुनीवस्ती परिसरात ऐवरन शहा भिकम शहा यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला होता. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान ऐवरन शहा यांचे दोन मित्र रशिद पवन या दोघांना पोलिसांनी संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान यांच्यावर संशय बळावल्यामुळे मंगळवारी पेालिसांनी दोघांनाही अटक केली आहे. ऐवरन शहा, रशीद पवन हे तिघेही गुरांचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायातून ऐवरनशहा सोबत वाद झाला त्यांनी खून केला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

घटनेच्या आदल्यादिवशी एेवरन शहा वसुलीसाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर रक्कम होती. मृतदेहाजवळ िकंवा घरात कुठेही पोलिसांना ही रक्कम आढळून आली नाही. यानंतर पोलिसांचा संशय बळावला होता. शहा यांचा आकस्मात मृत्यू नसून हा खून असल्याचे पोलिसांना संशय होता. शहा यांच्याकडील व्यवसायाची डायरी काही रोकड लंपास झालेली आहे. ती रोकड डायरी याच दोघांकडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ते जप्त करण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. तपासादरम्यान आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.