आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Person Turbulence In Municipal Corporation At Amravati, Divya Marathi

मनपात मद्यपींचा गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर आणि उपायुक्तांच्या कक्षात दोन मद्यपींनी मंगळवारी धुमाकूळ घातला. शिव्यांची लाखोली वाहत महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांचा त्यांनी ‘उद्धार’ केला. उपायुक्त रमेश मवासी व कर्मचार्‍यांसोबत धक्काबुक्की करण्याचा प्रकारदेखील यादरम्यान घडला. त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आयुक्त अरुण डोंगरे यांची दोघांनी दुपारी 12 च्या सुमारास भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी साडेचारला यथेच्छ मद्यपान करून ते परतले. विजय अनासाने व चंद्रशेखर जावरे अशी धुमाकूळ घालणार्‍या मद्यपींची नावे आहेत. महापालिका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील शहर अभियंता ज्ञानेंद्र मेर्शाम यांचे कार्यालय गाठले. ते कार्यालयात नसल्याचे पाहून त्यांनी तेथेच शिवीगाळ केली. महिला कर्मचार्‍यांदेखत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. यानंतर विजय व चंद्रशेखर यांनी आयुक्त डोंगरे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. आयुक्तांच्या कक्षाजवळ उपायुक्त रमेश मवासी यांचा कक्ष समजून त्यांनी आधी स्वीय सहायकाच्या कक्षाचा दरवाजा बंद केला. गफलत झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी थेट उपायुक्त मवासी यांचा कक्ष गाठला. तेथे मवासी यांच्यासह उपस्थितांना शिवीगाळ करीत त्यांनी गोंधळ घातला. उपायुक्तांना त्यांनी धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. यादरम्यान आयुक्त कार्यालयातून पोलिसांना गोंधळाची माहिती देण्यात आली.
दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करू
महापालिका अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कमांडोंनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याची कल्पना नव्हते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याचे ठाण्यात आल्यानंतर कळले. तक्रार दाखल झाल्याने परत ताब्यात घेण्याची कारवाई करणार आहे. विजय साळुंखे, पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.
धक्काबुक्की, शिवीगाळ केली
मद्यपान केलेले दोघे कक्षात आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास आरंभ केला तसेच धक्काबुक्की केली. याबाबत शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. मद्यपींचे हे वर्तन निंदनीय आहे. सहकार्‍यांकडून त्यांची नावे विजय अनासाने व चंद्रशेखर जावरे असल्याची माहिती प्राप्त झाली. रमेश मवासी, उपायुक्त, महापालिका.

पोलिसांनी मद्यपींना फक्त चौकशी करून सोडले
महापालिकेत धुमाकूळ घालणार्‍या विजय अनासाने व चंद्रशेखर जावरे यांना पोलिस कमांडोंनी घटनास्थळाहून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास शहर कोतवाली ठाण्यात आणण्यात आले. तथापि, महापालिकेकडून तक्रार येण्याची वाट पाहण्यापूर्वीच कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. त्याउलट त्यांची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे होते. मद्यपींचे वर्तन आणि पोलिसांचे त्यांच्याबद्दल गंभीर नसणे ही बाब पालिका वतरुळात चर्चेची ठरली.