आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Student Became PSI From Municipal Sudy Center

कौतुकास्पद: मनपाच्या अभ्यासिकेतून दोघे झाले पीएसआय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्याअभ्यासिकेचा आधार घेत स्पर्धा परीक्षांशी लढणाऱ्या दोघांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या दोघांनीही राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

स्नेहल चव्हाण अमित खेकाडे असे या दोन विद्यार्थ्यांची नावे अाहेत. या यशाबद्दल मनपाच्या वतीने खुद्द आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यासाठी आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात एका कार्यक्रमात या दोघांचाही सत्कार केला गेला. विशेष असे की पोलिस अधिकारी झालेले हे दोघेही कला शाखेचे िवद्यार्थी असून त्यांची कौटुंबिक स्थिती जेमतेम आहे.
स्नेहल चव्हाण ही अमरावतीच्या आशियाना क्लबजवळ राहते. एमपीएससीच्या परीक्षेत ती मागासवर्गीय संवर्गातून राज्यात पहिली आली असून सर्वसाधारण संवर्गात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिची आई गृहिणी असून वडील खासगी कामे करतात. पीएसआय होण्यापूर्वी तिने बीए. डीटीएड असे शिक्षण पूर्ण केले आहे. अमित खेकाडेची िस्थतीही बेताचीच आहे. तो बीए , डीबीएम शिकला असून त्याची आई गृहिणी आहे. वडील शेतीत राबतात. अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला िवश्वेश्वर या लहानशा खेड्याचा तो मूळ रहिवासी आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच या िवद्यार्थ्यांनी मनपाच्या अभ्यािसकेत नोंदणी केली आणि तेथील पुस्तके मार्गदर्शनाचा आधार घेत पीएसआयपर्यंतची दौड पूर्ण केली.
दरम्यान या यशाबद्दल आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दोन्ही िवद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी उपायुक्त विनायक औगड, अभ्यािसकेचे संचालन करणारे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुरेंद्र कांबळे, खडेकार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेरणा मिळेल असे कार्य करा
स्नेहल चव्हाण अमित खेकाडे यांचा गौरव करताना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना इतरांना प्रेरणा मिळेल, असे कार्य आयुष्यात करण्याचे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले.
खडतर वाटचाल
स्नेहल-अमितची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच आहे. दोघांच्याही आई गृहिणी असून स्नेहलचे वडील खासगी कामे करतात, तर अमितचे वडील शेतमजुरी करतात.