आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्वाची लढाई; शिस्तीला गालबोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये (हव्याप्रमंं) शारीरिक शिक्षण घेणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून शनिवारी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे शिस्तीबाबत दबदबा असलेल्या संस्थेच्या इतिहासात आवारातील वाद पहिल्यांदाच रस्त्यावर आला.
हव्याप्रमंं येथे दरवर्षी हजारो विद्यार्थी ववििध अभ्यासक्रमांमध्येशिक्षण घेतात. यामध्ये सुमारे सातशे-आठशे विद्यार्थी परराज्यांतील असतात. शारीिरक शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये संस्थेचे देशभरात नाव आहे. ववििध प्रांतांतील भिन्न भाषा-संस्कृतींमधील हजारो विद्यार्थी येथीलशिस्तबद्धतेमुळे गुण्यागोविंदाने नांदतात. मात्र, शनविारी परराज्यातील विद्यार्थ्यांनी येथीलशिस्त परंपरा बाजूला सारत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांवर हल्ला चढवला. हाणामारी इतकी गंभीर होती, की वाद संस्थेच्या परिसरातून थेट मुख्य मार्गावर आला. त्यामुळे परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळावर जमले. परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. एरव्ही शहरामध्ये काही घडल्यास एचव्हीपीएमचा मोठा आधार शहरवासीयांना वाटतो. मात्र, शनविारच्या प्रकारामुळे शिस्तीची वचक कमी झाली काय? त्या दराऱ्यास तडा देण्याच्या घटना घडत आहेत काय, असा प्रश्न अमरावतीकरांना पडल्याचे नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झाले. संस्थेमध्ये बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनला संपूर्ण देशभरातून विद्यार्थी येतात. सिक्किम, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, मिझोरमसह अन्य राज्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांच्यामधील यापूर्वीचे वाद तेथेच मटिणारे, सौम्य प्रकारचे होते. मात्र, शनविारच्या वादाने ही परंपरा खंडित केली, असे मत व्यक्त होत आहे.
चौकशीअंती दोषींवर कारवाई होणारच
-क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. दोघांमध्ये झालेल्या वादामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण तापले. त्यांनी संस्थेच्या परिसराबाहेर जाऊन भांडण केले. हा प्रकार गंभीर आहे.विद्यार्थ्यांनीशिस्तीचा भंग केला आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. प्राचार्यडॉ. सुभाषचंद शर्मा, डिग्रीकॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, एचव्हीपीएम.
सर्वांना देण्यात आली समज
दुपारीविद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचवि प्रभाकरराव वैद्य यांनी महाविद्यालयातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना मैदानावर एकत्र आणले. त्यांना आपल्या खास शैलीमध्ये समज देण्यात आली. या वेळी शारीिरक शिक्षणासाठी असणारे सर्वच विद्यार्थी, प्राध्यापक हजर होते.
हाणामारी कशामुळे?
संस्थेमध्येबीपीई अभ्यासक्रमाला शिकणारे सर्वच विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात. तीन शिफ्टमध्ये महाविद्यालय सुरू असते. शनविारी दुपारी एकच्या सुमारास अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी अंघोळीसाठी बाथरूममध्ये जात होते. त्या वेळी एकाचा दुसऱ्याला धक्का लागला. या क्षुल्लक कार‌णावरून सुरू झालेला वाद प्रचंड हाणामारीपर्यंत पोहोचला. पहिल्यांदा सिनिअर्स अंघोळ करतील, असा आग्रह सिनिअर्सनी धरला. मात्र, ज्युनिअर्सनी तो मानला नाही. त्यामुळे, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकाने मारहाणीस सुरुवात केली. काही वेळामध्ये त्याचे रूपांतर दोन गटांमधील हाणामारीमध्ये झाले.