आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तलाठी, एक लिपिक बडतर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अँटीकरप्शन विभागाने केलेल्या कारवाई दोषी आढळलेल्या तीन जणांना महसूल सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी ही कारवाई केली. यात दोन तलाठी एका लिपिकाचा समावेश आहे.
या तिघांना न्यायालयानेही खटल्यात दोषी ठरवले होते, असे महसूल विभागाने स्पष्ट केले. अंजनगावसुर्जी येथील तलाठी मोहन जायभाये, वरुड येथील तलाठी गजानन मालवीय आणि नांदगाव खंडेश्वर येथील महसूल लिपिक कैलास उमाळे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. अँटी करप्शनच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणा-यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या या आदेशांचे कठोरतेने पालन करण्यास सुरुवात केली.


न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई
सुप्रीमकोर्टाने अँटी करप्शनच्या प्रकरणांबाबत सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाकडून आता अशा प्रकरणांबाबत सातत्याने पाठपुरावा होत आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार तीन जणांना बडतर्फ करण्यात आले. किरणगित्ते, जिल्हाधिकारी