आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Criticizied On State Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैनिकांच्या हौतात्म्याचे सरकारला वावडे : ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सैनिकांच्या हौतात्म्याची तीव्रता कमी करणार्‍या केंद्र शासनाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावतीत वाभाडे काढले. केवळ शिवसेनाच देशाला शत्रूंपासून वाचवू शकते, असे सांगत शासनाने शेळपट वागू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या माने यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना ‘सैनिकांच्या वाट्याला नव्हे तर काय, तुमच्या-आमच्या वाट्याला हौतात्म्य येणार’, असा अशोभनीय शब्दप्रयोग झाल्याचा ठाकरे यांचा आरोप आहे. हे सरकार शेळपट असल्याचा टोला लगावून ‘ते जर मरण्यासाठी आहेत, तर तुम्ही काय फक्त खाण्यासाठी आहात’, असा प्रतिप्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

जिल्हाभरातील बूथप्रमुखांच्या मेळाव्यासाठी ठाकरे अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी चौफेर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, गेल्या पाच दिवसांत तीनवेळा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आहे. बाळासाहेब असते, तर त्यांनी ‘हिजड्यांचं सरकार’ या शब्दात समाचार घेतला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, गुलाबराव गावंडे, आमदार अभिजित अडसूळ, अनंत गुढे, संजय बंड, बाळासाहेब भागवत, सुधीर सूर्यवंशी, दिगंबर डहाके आदी उपस्थित होते.

.तर 99 मध्येच सरकार आले असते
ठाकरे यांच्या मते, पक्षाने केलेली कामे तळागाळापर्यंत पोहचवली गेली नाही. शिवसैनिक कोठे तरी कमी पडला, नाही तर दुसरे म्हणतात त्याप्रमाणे 1999 पर्यंतच आपण सत्तेत आलो असतो. किमान आता तरी तशी चूक होऊ देऊ नका. पुढचे सरकार हे आपलेच आहे, हेही त्यांनी सांगून टाकले.

शेवटची तार राहुल गांधीनाच
बूथप्रमुख आणि त्यांची कार्ये स्पष्ट करताना तो फिरणारा असावा, असे ठाकरे सांगत होते. मात्र, फिरणारा म्हणजे पोस्टमन किंवा तार पोहचवणारा नव्हे, हेही स्पष्ट केले. याच विषयाला जोडून बंद झालेल्या तार विभागाचा त्यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, देशात शेवटची तार राहुल गांधींना पाठवली गेली असून ‘काँग्रेस इज सिरीयस, स्टार्ट इमिजिएट’ असे त्यात लिहिले होते.