आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार फसवेगिरी करणारे जादूगार : उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- शरद पवारांनी वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, सोनिया गांधींनाही फसवल्याने ते फसवेगिरी करणारे जादूगार असल्याची टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.
येथील नेहरू मैदानावर आयोजित महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, पवार यांनी अमरावती, ठाणे, वाशीममध्ये फोडाफोडी करून पक्ष वाढवण्याचे काम केले. सत्ताधार्‍यांनी विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अशा गुन्हेगारांना मते मागण्याचा हक्क नसल्याचेही ते म्हणाले. खासदार आनंदराव अडसूळ यांनीही या वेळी मत व्यक्त केले. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, माजी खासदार अनंतराव गुढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, बाळासोहब हिंगणीकर, आमदार अभिजित अडसूळ, रूपेश ढेपे, साहेबराव काठोळे, किशोर कासार, नरेंद्र पडोळे, आशीष सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली.