आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thakeray News In Marathi, Vidarbh, Gopinath Munde, BJP

महायुतीची विदर्भातील जाहीर सभेला उद्धव ठाकरे,गोपीनाथ मुंडे येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाइं (आठवले) व अन्य पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या महायुतीची विदर्भातील पहिली जाहीर सभा शुक्रवारी (दि. 14) दुपारी दोन वाजता होत आहे.सायन्सकोर मैदानावर होणार्‍या सभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, खासदार रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.
अमरावती मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी पूर्वीच घोषित करण्यात आली आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच त्यांच्या प्रचारासाठी महायुतीतील बड्या नेत्यांची शुक्रवारी सभेसाठी उपस्थिती असणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत रिपाइंला (गवई गट) ही जागा न सोडता नवनीत कौर-राणा यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रथमच अमरावती लोकसभा मतदारसंघात रिंगणात उतरला आहे. नवनीत राणा यांचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.
गारपीटग्रस्तांबाबत भूमिका मांडणार!
गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. मात्र, अद्याप दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे शुक्रवारच्या सभेत उद्धव ठाकरे शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदारांकडून धावपट्टीची पाहणी
बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या मजबुतीबाबत संभ्रम आहे. सभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विमानाने येणार असल्याने धावपट्टीची पाहणी खुद्द आमदार अभिजित अडसूळ यांनी केली. ते स्वत: पायलट आहेत. धावपट्टी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.