आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम मामाला चार महिन्यांनंतर अटक, नऊ वर्षीय भाचीवर अत्याचारानंतर दाबला होता गळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा येथे राहणा-या एका नऊ वर्षीय चिमुकलीला चुलत मामानेच घरातून अपहरण करून नेले. चिमुकलीवर अत्याचार केला नंतर तिचा गळा दाबून खून केला. या निर्दयी कृत्यानंतर हा नराधम पसार होता. पोलिसांनीही त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नव्हता. अखेर गुरुवारी (दि. २) अकोला रल्वेस्थानकावर तो असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला बडनेरा पोलिसांनी अकोल्यात जावून अटक केली आहे.

घनश्याम एकनाथ वाडेकर (३५ रा. काटआमला) असे त्या नराधमाचे नाव आहे. घनश्यामने १९ नोव्हेंबर २०१४ ला बडनेरा येथे राहणा-या चुलत बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले होते. या प्रकारानंतर चार दिवस चिमुकलीच्या कुंटंुबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नव्हती. दरम्यान, घनश्यामही सापडला नव्हता. त्यामुळे त्याच दिवशी चिमुकलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनीही शोध मोहीम राबवली. पण पोलिसांना त्यामध्ये यश आले नाही. दरम्यान २६ नोव्हेंबरला काटआमला मार्गावर असलेल्या एका शेताच्या धु-यावर एका बालिकेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह त्याच चिमुकलीचा होता. शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे गळा दाबून खून केल्याचे पुढे आले होते. त्याच दिवशी घनश्यामविरुद्ध बलात्कार खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्या शोधार्थ बडनेरा, गुन्हे शाखा पोलिसांचे पथक अनेक शहरांमध्ये तसेच घनश्यामचे नातेवाईक ज्या ज्या गांवामध्ये आहे, त्या गावांमध्ये शोध घेत होते. मात्र, चार महिन्यानंतरही पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले नव्हते.

त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आजूबाजुच्या जिल्ह्यांतील पोलिसांना माहितीही दिली होती. गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर घनश्याम वाडेकर बसलेला असल्याचे अकोला रेल्वे पोलिसांना आढळला. त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन ही माहिती बडनेरा पोलिसांना दिली. पकडलेला घनश्याम वाडेकर असल्याची खात्री केल्यानंतर बडनेरा ठाणेदार ज्ञानेश्वर कडू पथकासह अकोल्याला रवाना झाले त्यांनी घनश्यामला अटक करून बडनेरात आणले. अखेर चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर चिमुकलीचा मारेकरी पोलिसांना मिळाला आहे.