आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिकट वाट: प्रशिक्षण झाले, रोजगाराचे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रूपेश टिंगणे यांना प्रशिक्षणानंतर मिळालेले प्रमाणपत्र )
अमरावती- उच्च शिक्षणानंतरही नोकरी न मिळाल्याने एका सुक्षिशित बेरोजगाराने शासनाच्या जिल्हा उद्योग केन्द्र मिटकॉनच्या सयुंक्तपणे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ५० दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केले. आता याच प्रशिक्षणाच्या आधारे व्यवसाय सुरू करायचा म्हणून त्याने प्रमाणपत्राच्या आधारे परवाना काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या युवकाला शासनाच्याच एका विभागाकडून शासकीय यंत्रणेच्याच प्रशिक्षणाच्या आधारावर परवाना मिळत नाही. त्यामुळे या युवकाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुनी टाकसाळ बुधवारा परिसरातील रुपेश अशोकराव टींगने (२९) असे या युवकाचे नाव आहे. त्यांचे एम. ए. बीएड पर्यंत शिक्षण पुर्ण झालेले आहे. रुपेश यांनी २०१० मध्ये मिटकॉन जिल्हा उद्योग केन्द्र यांच्या संयुक्तपणे आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतंर्गत उद्योजकता विकास तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत ५० दिवसांचे वनौषधी लागवड प्रक्रीयेवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण पुर्ण केले. प्रशिक्षण पुर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्रही रूपेशला मिळाले.
या प्रमाणपत्रावर मिटकॉन जिल्हा उद्योग केन्द्राचा लोगो असून चार अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीही आहेत. यामध्ये तत्कालीन वरीष्ठ उपाध्यक्ष, उद्योजकता विकास, मिटकॉनचे विभागीय व्यवस्थापक, मिटकॉनचे प्रशिक्षण समन्वयक आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्या स्वाक्षरींचा समावेश आहे. याच प्रशिक्षणाच्या आधारे रुपेश यांना आयुर्वेदिक दंत मंजन तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे त्यांनी सहायक आयुक्त, अन्न औषधी प्रशासन यांच्या कार्यालयात परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे आम्ही परवाना देऊ शकत नाही, असे स्पष्टपणे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशिक्षणाच्या आधारे उद्योग सुरू करायचा आहे, मात्र परवाना मिळाल्यास एकतर अवैधपणे उद्योग थाटावा लागेल किंवा बेरोजगारच रहावे लागेल, अशी बिकट अवस्था झाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हे पाहा, काय आहे अधिकाऱ्यांचे म्हणणे?...