आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठातील सुरक्षा अधिकाऱ्याचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी अनिरुद्ध जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, कुलगुरू डॉ. खेडकर यांनी तो मंजूर केल्याची माहिती आहे. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्याचा प्रभार कोणाकडेही दिला नाही. त्यामुळे विद्यापीठाचे नवीन सुरक्षा अधिकारी कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

विद्यापीठ महाविद्यालयीन विकास मंडळ (बीसीयूडी) माजी संचालक डॉ. अजय देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर सुरक्षा अधिकारी जोशी यांनी राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला. विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण, भ्रष्टाचारांच्या प्रकरणाने आंदोलनाचे सत्र सुरू होते. यादरम्यान विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली होती. गुणवाढ प्रकरणानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून कुलगुरूंचा पाणउतारा केला होता. कुलगुरूंचा त्यांच्याच कक्षात अशाप्रकारे पाणउतारा होण्याची कदाचित पहिलीच वेळ होती, त्यामुळे साहजिकच सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढणे अपेक्षित होते. यानंतर विद्यापीठाची सुरक्षा बळकट करण्याचे आदेश निघताना यंत्रणेच्या प्रमुखाकडून दिलेला राजीनामा चर्चेचा विषय झाला आहे. शिवाय विद्यापीठात नियुक्ती मिळवताना नियमबाह्यतेचे प्रकरण उघडकीस आले आहे.

बीसीयूडी संचालक डॉ. अजय देशमुख यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती मिळवल्याने राजीनामा देण्याची वेळ आली. वित्त लेखा अधिकारी पदाची मुलाखत देत डॉ. अभय तारे यांनी असाच प्रयत्न केला होता.

मात्र, व्यवस्थापन परिषदेचे सदस्यांनी डॉ. तारे यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. डॉ. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांनी धास्ती घेतली आहे. असे असले तरी जोशी यांच्या राजीनाम्याचे गूढ कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...