आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्या विद्यापीठ संघाचे शहरात स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील नागार्जुन विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणार्‍या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाचे रविवारी साडेअकरा वाजता शहरात आगमन झाले. विजेत्या संघाचे अमरावतीकरांनी उत्साहात स्वागत केले. विजेत्या संघाची ओपन जिप्सीतून विजयी मिरवणूक काढण्यात आली. संघ बडनेरा येथे पोहोचल्यानंतर तेथून राजकमल चौक आणि विद्यापीठ, अशी विजयी मिरवणूक काढून विजेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

सांघिक क्रीडा प्रकारात प्रथमच जेतेपद मिळवून अमरावती विद्यापीठाने इतिहास रचला आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवरून ओपन जिप्सीमधून राजकमल चौकात खेळाडूंचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या निनादात त्यांचे स्वागत झाले. शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांनी खेळाडूंना माल्यार्पण केले. खेळाडूंनीही ट्रॉफी उंचावून नागरिकांना अभिवादन केले. खेळाडू ट्रॅाफी उंचावून तसेच सुवर्णपदक दाखवून आपला आनंद व्यक्त करत होते. नेत्रदीपक मिरवणुकीमध्ये मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होते. स्वागतसमारंभानंतर खेळाडू, प्रशिक्षक तसेच व्यवस्थापक यांनी नृत्याचा आनंद लुटला. या वेळी शिवसेनेचे नाना नागमोते, उमेश घुरडे, सुनील राऊत, प्रमोद येवतीकर, शारीरिक शिक्षण व रंजक मंडळाचे अध्यक्ष माणिकराव देशमुख, प्रा. हेमंत देशमुख, संतोष सावरकर, वैभव अर्डक, अभिजित इंगोले, वीरेंद्र भोसले, प्रा. अतुल बिजवे व प्रा. दिवाकर रुईकर, प्रा. रजनी भोयर, दर्शना पंडित, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सॉफ्टबॉल प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

विजयी संघातील खेळाडू :
शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचा प्रणव दंडाळे (कर्णधार), उर्वरित संघात त्याच महाविद्यालयाचा पवन सैरिसे, आशीष झिमटे व अभिजित फिरके, सचिन हरणे, भारतीय महाविद्यालयाचा प्रतीक मनके, नीलेश शिवणकर व मंगेश इंगोले; विकास पंडित, सुशील सरदार व राजकुमार वर्धे; अकोला येथील शंकरलाला खंडेलवाल महाविद्यालयाचा रितेश राठोड, यवतमाळचा विशाल डहाके, अमरावती येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा हृषीकेश लकडे तर वरुड येथील शिवरामजी हिवसे महाविद्यालयाचा प्रफुल्ल देशमुख यांचा संघात समावेश होता. मुलांच्या संघाला मोर्शी भारतीय महाविद्यालयाचे प्रा. सावन देशमुख व्यवस्थापक तर प्रशिक्षक म्हणून ए. एच. इंगोले होत