आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • University Swimming Championship,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ जलतरण स्‍पर्धा- १५०० मीटर शर्यतीत कुणाल चव्हाण भन्नाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- डीसीपीईच्याकुणाल चव्हाणने झपझप पाणी कापून पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत २४ मिनिटे ४८.३१ सेकंद वेळेसह विद्यापीठ जलतरण स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. त्याचा सहकारी स्टॅनझिन स्टोबडॅनने ३१ मि. ४३.४७ सेकंद वेळ काढून उपविजेतेपदावर ताबा मिळवला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे हव्याप्रमंच्या सहकार्याने एचव्हीपीएम आंतरराष्ट्रीय जलतरण केंद्रावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुरुषांच्या शंभर मी. बॅकस्ट्रोक प्रकारात डीसीपीईच्या आशुतोष तिवारीने एक मिनिट २०.६२ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. विनायक महाविद्यालयाच्या अक्षय अंबाडकरने एक मिनिट ३४.३१ सेकंद वेळेत अंतर पूर्ण करून रौप्यपदक पटकावले, तर अकोला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सोनुकुमार कुशवाहने दोन मि. १७.७१ सेकंद वेळेसह कांस्यपदकावर ताबा मिळवला. पुरुषांची १०० मी. फ्री स्टाइल शर्यत डीसीपीईच्या मृत्युंजय दुबेने एक मि. ०५.०९ सेकंद वेळेत जिंकून वेगवान जलतरणपटू असा मान मिळवला. भारतीय महाविद्यालयाच्या चेतन राऊतने एक मि. ०९.८७ सेकंद वेळेत दुसरा, तर आयबीएसएसच्या परिमल लेंघेने एक मि. २२.६९ सेकंद वेळ काढून तिसरा क्रमांक पटकावला. शंभर मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात डीसीपीईच्या चेतन शर्माने एक मि. ३०.०२ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करून बाजी मारली. त्याचा सहकारी प्रयुष चेत्रीला एक मि. ४०.९२ सेकंद वेळेसह दुसऱ्या आयबीएसएस महाविद्यालयाच्या परिमल लेंघेला एक मि.४६.८१ सेकंद वेळेच्या आधारे तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. विद्यापीठ जलतरण निवड समिती प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत खंडागडे, सचिन देशमुख, डॉ. योगेश निर्मळ आणि प्रा. प्रतिमा बोंडे यांच्या निरीक्षणाखाली या स्पर्धा झाल्या. मी. बॅकस्ट्रोक प्रकारात डीसीपीईच्या आशुतोष तिवारीने एक मिनिट २०.६२ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. वॉटरपोलो स्पर्धेत लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात असलेले प्रतिस्पर्धक खेळाडू. छाया: मनीष जगताप