आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishali Mande News In Marathi, APP, Amravati Lok Sabha Seat, Divya Marathi

मनसेचे ‘इंजिन’ वैशाली माडेंकडे.!,उच्च्पदस्थ सूत्रांकडून मिळाले संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘सा रे ग म प’ हा लोकप्रिय गाण्याचा शो जिंकणारी मूळची खारतळेगाव येथील गायिका वैशाली माडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेत. येत्या एक-दोन दिवसांत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब महायुतीची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना तोडीस तोड उमेदवार असावा म्हणूनच माडे यांच्यासारख्या राज्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या कलाकाराची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा बाकी असल्याचेही सूत्रांनी सांगितले.


‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम वैशाली यांनी जिंकावा म्हणून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना एसएमएसद्वारे मतदान करण्याचे आवाहनही केले होते. विजयी झाल्यानंतर मुंबईत त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला होता. मनसेने आजवर सहकार्य माडे यांना केले आहे. त्यामुळे माडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.


उमेदवारीसाठी सुरू आहे रस्सीखेच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. यात दर्यापूरचे गोपाल चंदन, डॉ. राजीव जामठे, दिनेश बूब आणि गुणवंत देवपारे यांचा समावेश आहे. मात्र, वैशाली माडे यांना उमेदवारी देण्याची इच्छा मनसेच्या वरिष्ठांनीच व्यक्त केली असून, माडे यांच्या नावावर आगामी दोन दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सासरी-माहेरीही राजकीय वातावरण
वैशाली माडे यांचे चुलतभाऊ हे भातकुली परिसरातील नामांकित राजकीय व्यक्तिमत्त्व राहिले असून, ते भातुकली पंचायत समितीचे सभापती राहिलेत. त्यांचे माहेरचे आडनाव हे भैसने असून, सामाजिक कार्यकर्ते दलितमित्र उत्तमराव भैसने यांच्या त्या नातेवाईक आहेत.