आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘..हे तर देवाघरचे देणे’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण या हक्काच्या दिवसाची वाट पाहत असतो. जोडीदार निवडण्याची आणि एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी
‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. आठ दिवसांवर तो येऊनही ठेपला आहे.

वसंतपंचमी आणि फाल्गुन महिन्यादरम्यान उत्सवांच्या दरवाज्यावर टकटक करत येणारा व्हॅलेंटाइन डे. या दिवसातील गोडवा वाढवण्यासाठी व्हॅलेंटाइन वीक या संकल्पनेने जन्म घेतला. आठवडाभर चालणारा हा प्रेमोत्सव शुक्रवारपासून (दि. 7) सुरू झाला आहे. त्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन वीकची जय्यत तयारी सुरू आहे. कित्येकांनी दिवस अविस्मरणीय ठरावा म्हणून विवाहबंधनात अडकण्यासाठी प्रेमदिनाचाच मुहूर्त निवडलाय.

शुक्रवारपासूनच व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनाला तरुणाईमध्ये सुरुवात झाली असून, रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे असे विविध डेज आठवडाभर तरुणाई साजरे करणार आहे. प्रेमाचा आठवडा किंवा प्रेम दिन कसा साजरा करणार, यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत. ‘दिव्य मराठी’कडे तरुणाईने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया त्यांच्यात शब्दांत..

वैश्विक असावे
प्रेम म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत नव्हे. त्याची व्याख्या करता येत नाही. ते वैश्विक असावं. त्याला विरोध कशाला हवा? प्रेम हे फुलासारखे उमलून बहरणारे असावे. सोनाली देवबाले, विद्यार्थिनी

घाबरायचे कशाला अन् कुणाला?
मनातील भावना व्यक्त करताना घाबरण्याचे कारण नसून बिनधास्त भावना व्यक्त कराव्यात. नकार मिळालाच तर ती पचवायची ताकदही हवी. सचिन बुरघाटे, विद्यार्थी

महत्त्वच देत नाही
या दिवसाला आम्ही मैत्रिणी महत्त्वच देत नाहीत. नेहमीच्या दिवसासारखाच हा दिवस असेल. याच्या सेलिब्रेशनसाठी कित्येक गुलाबाच्या फुलांचा बळी जात असतो. इतरही नाती आहेत ना प्रेम व्यक्त करायला. श्रद्धा देशमुख, विद्यार्थिनी

ग्रुपमध्ये जल्लोष आहे
प्रेम व्यक्त करायला विशिष्ट दिवसाची गरज नसते. मात्र, हा हक्काचा दिवस आहे. कॉलेजमध्येच सर्व मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये हा दिवस साजरा करणार आहोत.