आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॅलेंटाइन डे’ ला शिवसेना, बजरंग दलाचा नागपुरात विरोध'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- व्हॅलेंटाइनडे साजरा करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले अाहे. व्हॅलेंटाइन डे ला शिवसेना आणि बजरंग दलाची विरोधाची भूमिका कायम असून, शुक्रवारी त्यांनी फेरी काढून निदर्शन केले.
काही वर्षांपासून व्हॅलेंटाइन डे ला शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जात असून, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण अाहे, असा आक्षेप घेण्यात येत आहे. यंदाही शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला नाही. शुक्रवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बॉटनिकल गार्डन ते फुटाळा तलावापर्यंत फेरी काढली. या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शने करून व्हॅलेंटाइन साजरा करणाऱ्यांना दम भरण्याचा प्रयत्न केला. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून विरोधाची धार कमी कमी होत गेली असून, त्यामुळेच यंदाही केवळ इशाऱ्यापुरताच शिवसेनेचा विरोध असेल, असे चित्र दिसत आहे. शिवसेनेसोबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी वाजता रहाटे कॉलनी येथील गोरक्षण सभागृहापासून फेरी काढली आणि व्हॅलेंटाइन डे ला विरोध केला.
या राजकीय भूमिकांच्या पार्श्वभूमीवर, पोलिस यंत्रणेनेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे.