आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3900 रुपये क्विंटल कांदा, सर्वच भाज्यांचे दर सरासरी 70 रुपये किलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- भाजीबाजारात कांद्याची आवक कमी असल्यामुळे शनिवारी भाव 3900 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. किरकोळ बाजारात कांदा 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.

जून महिन्यांपासून कांद्याच्या भावाचा आलेख चढता आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या हंगामात कांद्याचे अल्प उत्पादन झाले. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचे भाव वाढत राहिले. बाजारात येणारा बहुतांश कांदा व्यापार्‍यांचा आहे. यावर्षी कांद्याला सुरुवातीपासून भाव चांगले राहिल्याने शेतकर्‍यांनी 500 ते हजार रुपये क्विंटल दराने शेतातूनच कांदे विकले. मोजक्याच शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला. त्यामुळे या भाववाढीचा फायदा व्यापार्‍यांनाच अधिक झाला आहे. सामान्य ग्राहकांसाठी मात्र कांदा महागच ठरला आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याप्रमाणे इतर भाज्यांची आवकही र्मयादित असल्याने भाज्यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहिले आहेत. फूलकोबी, बरबटी, पालक, कारले, लसूण, सिमला मिरची, भेंडी, अद्रक यांचे भाव किरकोळ बाजारात तेजीत आहेत. अद्रक सर्वाधिक 200 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.

आवक कमी
यावर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच कांद्याचे दर तेजीत आहेत. गेल्या 15 वर्षांत प्रथमच कांदा मोठय़ा प्रमाणात महाग झाला आहे. किशोर खारकर, व्यापारी

भाज्या महागल्या
भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहक बाजारात फारसे फटकत नाहीत त्यामुळे भाजीचा व्यवसाय समाधानकारक होत नाही. दीपक पखाले, किरकोळ विक्रेता