आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक शिक्षकांच्या पाठीवर जड झाले अाेझे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सरकार एव्हाना खेळांवर भर देत आहे. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेसोबतच महाविद्यालयीत स्तरावर झपाट्याने खेळांची संख्या वाढत आहे. आता तर योगाचाही आपण प्रचार प्रचार करण्याचा विडा उचलला आहे. असे असताना ज्यांच्या बळावर हा डोलारा उभा करण्याची कसरत चालली आहे, त्यांच्याकडेच शासनाचे लक्ष नाही. बहुतेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांची उणीव आहे.

महाविद्यालयांचीही स्थिती वेगळी नाही. शासकीय असेल तर तेथे किमान दोन िनयमित आणि आवश्यकतेनुसार तासिकांप्रमाणे शारीरिक शिक्षक िनयुक्त केले जातात. येथे एक शारीरिक शिक्षण संचालक पद अनिवार्य आहे. विना अनुदानीत कायम विना अनुदानीत शाळा, महाविद्यालयांना तर शारीरिक शिक्षकांचे महत्त्वच नाही. पैसे वाचवण्यासाठी जमेल तसे िनभावले जाते.

शुल्क मात्र पूर्ण आकारले जाते. िदखावा म्हणून खेळासाठी मैदानही असते नसतो मात्र मुलांना शिकवणारा शारीरिक शिक्षक. खेळाडू स्वत:च जमेल तसे खेळतात. तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत खेळून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवता येतील? आता यात योगासनांची भर पडली तर योगतज्ज्ञांची िनयुक्त करावी लागेल, काही खरे नाही. यासाठी शासनाला शारीरिक शिक्षक योगतज्ज्ञांची नियुक्त अनिवार्य करावी लागेल, तेव्हाच हा हा गाडा व्यवस्थित ओढला जाईल. २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक असावा असा १९८८ चा शासनाचा अध्यादेश आहे. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. जर योग हा िनयमित विषय झाला तर िकमान योगतज्ज्ञांच्या नियुक्तबाबत असे होऊ नये, याबाबत शासनाला दक्षता पाळावी लागेल. अन्यथा जे शारीरिक शिक्षक सध्या सेवेत आहेत, त्यांचेच हाल होतील. शिखर संस्थांनी नवा अभ्यासक्रम सुरू करताना िकंवा घोषणा करण्यापूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत काय.
शिक्षक-
विद्यार्थी-
श्री शिवाजी मराठी हाय.
योग शिक्षकांची नियुक्ती फायद्याची

अस्तित्वात असलेल्या शारीरिक शिक्षकांसोबतच योगशिक्षकांचीही नियुक्त महाविद्यालयांमध्ये झाल्यास खेळाडूंना फायदा होईल. क्रीडा शिक्षकांनाही त्यांची खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यास मदत िमळेल. शासनाचा प्रस्ताव योग्य आहे. डाॅ.अविनाश असनारे, संचालक विद्यापीठ क्रीडा रंजन विभाग.

पाठीवरचे ओझे कमी व्हावे
^विद्यार्थ्यांच्यापाठिवरचे ओझे कमी करण्याची क्रीडा शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली. त्याप्रमाणे शारीरिक शिक्षकांच्या पाठिवरचेही ओझे त्यांनी कमी करायला हवे. एकाच शारीरिक शिक्षकाला शेकडो विद्यार्थी सांभाळताना असंख्य अडचणींचा सामना सामना करावा लागतो. िनतीनचवाळे, सचिव, िजल्हा शारीरिक शिक्षक संघटना.
शारीरिक शिक्षकांच्या समस्या
* आठवड्याचेतास १८ते १९
* आठवड्याच्यातासिका ३६ते ३८.
* आंतरशालेयस्पर्धा सकाळीते सायं. ६.
* स्पर्धावयोगट : १४, १७ १९ वर्षांखालील.
* स्तर: िजल्हा,विभाग, राज्य
* वेतन: कामाच्यातुलनेत अपुरे.
* सहायक शारीरिक शिक्षक : बहुतेकशाळांमध्ये नाहीत.
* योगाचा समावेश केल्यास आणखी दडपण वाढणार
बातम्या आणखी आहेत...