आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंड वातावरणामुळेच ‘स्वाइन फ्लू’चा धोका, नागरिकांनी दक्षता बाळगण्याची आवश्यकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- उन्हाळ्यात स्वाइन फ्लूचे विषाणू हे १५ ते २० मिनिटे जिवंत असतात. परंतु, थंडीत ते तास जिवंत राहू शकतात. महाराष्ट्रात सध्या थंड वातावरण असल्यामुळे स्वाइन फ्लूचा धोका कायम अाहे’, अशी चिंता सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी व्यक्त केली.
ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातील स्वाइन फ्लूवर उपाययोजनेसंदर्भात नागपुरात एक बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ऊर्जा मंत्र्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पवार यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात रविवार, फेब्रुवारीपर्यंत १९३ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत १३८ लोकांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला, तर २७५ रुग्ण संशयित आहेत.
राज्यामध्ये स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव विदर्भामध्ये आहे. विदर्भात जानेवारी ते आजवर ८५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी १९ जण मृत्युमुखी पडले. विदर्भामध्ये पहिला रुग्ण जानेवारी रोजी आढळला आणि जानेवारीला त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी या बैठकीमध्ये उपस्थितांना दिली.
आशा वर्करलाही देण्यात आले प्रशिक्षण
स्वाइनफ्लूच्या उपचारासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु, गावपातळीवर काम करणाऱ्या आशा आरोग्य वर्करलाही दोन ते तीन दिवसांत स्वाइन फ्लूसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णाची माहिती दिल्यास त्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
जागरूकता करणे महत्त्वाचे
स्वाइनफ्लू आजार बळावण्याचे कारण म्हणजे लोकांमधील अज्ञान. स्वाइन फ्लूवर उपचार उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात उपचाराची सुविधा आहे. नागरिकांना ताप, खोकला, पडसे आदी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वाइन फ्लूच्या रुग्णाला ४८ तासांच्या आत उपचार मिळाल्यास रुग्ण दगावत नाही. नागरिकांनी खोकणे आणि शिंकताना तोंडावर रुमाल घ्यावा. दर एक तासाने साबणाने हात धुवावे. यामुळे स्वाइन फ्लूला नियंत्रित करता येऊ शकते.
दृष्टिक्षेपात स्वाइन फ्लू
‘उन्हाळ्यात स्वाइन फ्लूचे विषाणू हे १५ ते २० मिनिटे जिवंत असतात.
थंड वातावरणामध्ये ते तास राहू शकतात िजवंत
आणि जानेवारीला त्याचा मृत्यू झाला
विदर्भात पहिला रुग्ण जानेवारी रोजी आढळला.
१९ रुग्ण विदर्भातील मृत्युमुखी पडले.
८५ रुग्णांना विदर्भात जानेवारी ते आजवर स्वाइन फ्लूची लागण.
२७५ रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित.
१३८ जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.
१९३ लोकांना फेब्रुवारीपर्यंत स्वाइन फ्लूची लागण झाली.