आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीच लिहितील आता तलाठी, ग्रामसेवकांचा सीआर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यात भाजपचे सरकार आले तर गावागावातील तलाठी आणि ग्रामसेवकांचा गोपनिय अहवाल शेतक-यांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे लिहिला जाईल,अशी घोषणा भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा संकल्प तावडे यांनी यावेळी केला. बडनेरा मतदार संघातील भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.६) सायंकाळी भातकुली येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
गावागावांमध्ये दैनंदिन कामकाजात तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी शेतकऱ्यांचा सर्वाधिक संबध येताे. मात्र शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत, असा अनुभव आहे. म्हणून तलाठी आणि ग्रामसेवकांच्या कामात सुधारणा व्हावी,यासाठी संबधित तलाठी आणि ग्रामसेवकांसंदर्भात शेतकऱ्यांचे मत काय हे भाजप सरकार जाणून घेईल आणि त्या आधारेच तयार हाेणाऱ्या गोपनिय अहवालाद्वारे तलाठी आणि ग्रामसेवकांना बढती, पगारवाढ िदली जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
यावेळी तुषार भारतीय, चेतन गावंडे, मुन्ना सेवक शर्मा, जयंत डेहनकर, अजय सारस्कर, हेमेंद्र जोशी, विनोद डागा, सुनील साहू, बाबा तिप्पट, जयश्री पोतदार, मिनाताई पाठक, सुधा तिवारी, ललीत समदूरकर, इत्यादी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.तावडे यांचे भाषण ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील जनसमुदाय मोठ्या संख्येने जमला होता.

बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या प्रचारार्थ भाजप नेते विनोद तावडे यांची जाहीर सभा भातकुली येथे सोमवारी सायंकाळी झाली. तावडे यांचे भाषण ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.बडनेराचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या प्रचारार्थ भाजप नेते विनोद तावडे यांची जाहीर सभा भातकुली येथे सोमवारी झाली. या वेळी विनोद तावडे यांचा सत्कार करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी.