अमरावती - मागील आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाने शहरात विषाणूजन्य तापाचा (व्हायरल फीव्हर) फैलाव होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून (इर्विन)विषाणूजन्य तापाच्या 494 रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे. चिमुकल्यांमध्येही आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
व्हायरल फीव्हरसह डेंग्यू संशयित, मलेरिया व कावीळचे रुग्णही शहरात आढळत आहेत. आठवड्याला सुमारे चार ते पाच डेंग्यू संशयित रुग्णांचे सॅम्पल पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा अधिक धोका संभवतो. त्यामुळे कोंदट, थंड वाताववरणापासून त्यांना दूर ठेवण्यासोबतच वर्दळीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे, स्वच्छता पाळावी, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. हृषिकेश नागलकर यांनी सांगितले.
ही घ्या काळजी
गर्दीच्या ठिकाणी तोंडाला रूमाल मास्क बांधा.
जेवणाआधी हात-पाय स्वच्छ धुवा
पाणी उकळून प्यावे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांपासून दूर राहावे.
ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे.
लक्षणे
डोकेदुखी, अंगदुखी.
थंडी वाजून ताप येणे.
घसा खवखवणे.
ओमिटिंग (उलटी होणे)
अशक्तपणा.