आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल, विठ्ठलचा अवघा गजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- टाळ मृदंगाच्या गजरा संगे मुखी पंढरीच्या पांडुरंगाचे नाम घेत संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा, चांदूरबाजार येथून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे. गुरुवारी या दिंडीचा शहरात मुक्काम होता.

श्री गुलाबराव महाराज सेवा संस्थेच्या वर्षातील विविध उपक्रमांपैकी पंढरपूर पायदळ वारी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. यंदा २० जून रोजी चांदूरबाजार येथून वारी निघाली. गुरुवारी गाडगेनगर, राजकमल चौक, रुख्मिणी नगरातील श्री हनुमान मंदिर आदी ठिकाणी वारकऱ्यांनी विसावा घेतला. साईनगर येथील साई मंदिरात सायंकाळी वारीचे मुक्काम होते. शुक्रवारी सकाळी साईनगर येथून पुढील मार्गाने दिंडी निघणार आहे. बडनेरा लोणी टाकळी येथे पालखी थांबणार आहे.

वारकरी भजनात दंग
"सावळ्या विठ्ठला', "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला',"ग्यानबा तुकाराम' आदी भजने वारकऱ्यांच्या आेठांवर रुंजी घालत आहेत.
पालखीचे दर्शन : चांदूरबाजार येथू पंढरपूकडे निघालेल्या या पालखीचा ठिकठिकाणी मुक्काम होत आहे. दरम्यान शेकडो भाविक पालखीचे दर्शन घेत आहेत.

वारकऱ्यांमध्ये उत्साह
पंढरपूरकडेनिघालेल्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत अाहे. ग्यानबातुकारामच्या गजराने वारकऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारलेला आहे.

चारशे वारकऱ्यांचा आहे सहभाग : पंढरपूरलानिघालेल्या पायदळ वारीमध्ये चांदूरबाजार ग्रामीण भागातून सुमारे चारशे भाविक सहभागी झाले आहेत. कीर्तन, गायन, पावल्या, हरीपाठ असे विविध कार्यक्रम या वारीदरम्यान साजरे होत आहेत. दररोज सायंकाळी वारकरी मुक्काम घेत आहेत.

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीने अंबानगरीतून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
बातम्या आणखी आहेत...