आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणी केंद्रावर बीएलओ फिरकलेच नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मतदारांनायादीत नावनोंदणीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने रविवार हा "सुपर संडे' म्हणून आणखी एक दिवस देण्यात आला होता. परंतु, नोंदणी केंद्रावर बीएलओ फिरकलेच नसल्याने सुपर संडे नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांची नावे मतदार यादीत उपलब्ध झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. विधानसभा निवडणुकीदरम्यान कुठलाही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणूक आटोपताच मतदारांच्या नावनोंदनीचा कार्यक्रम जिल्हाभरात सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमात गेल्या काही महिन्यांत तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक नव्या मतदारांनी नावनोंदनी केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता निवडणूक आयोगाने िवधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करीत आचारसंहितेची घोषणा केली. आचारसंहितेपूर्वी नावनोंदनी करणाऱ्या नवमतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरही नावनोंदणी पूर्ण झाली नसल्याने नागरिकांना अखेरची एक संधी म्हणून रविवार हा सुपर संडे घोषित केले होते. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका बसल्याने सुपर संडेच्या या कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाला.

शाळेला होते कुलूप
मतदानकेंद्र असलेल्या मोठे वडगाव परिसरातील जिल्हा परिषद शाळेत गेलो. त्या शाळेत कुणीही हजर नव्हते. शाळेला कुलूप लावलेले होते. त्यानंतर विचारणा करून तहसील कार्यालयात आलो. तेथेही अर्ज घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे फेऱ्या मारण्याची वेळ आली. अमरगिरी,
प्रतापनगर.अर्जचदिले नाहीत

नावनोंदणीकरता अर्ज घेण्यासाठी वडगाव परिसरातील शिवराज शाळेच्या बाजूच्या शाळेत गेलो. त्या ठिकाणी अर्ज मागितला. तेथे केवळ ४० अर्ज होते. मात्र, दीडशेहून अधिक लोक तेथे आल्याने अर्ज संपले असे सांगून तहसील कार्यालयात जाण्याचा सल्ला िदला गेला. हिमांशूराजा, श्रीकृष्णनगर.

नागरिकांनासोसावा लागला मनस्ताप
प्रशासनानेरविवारी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, योग्य नियोजनच केले नाही. सकाळपासून शेकडोंनी फोनवर संपर्क करून आणि प्रत्यक्ष भेटून या संदर्भात काय करावे, अशी विचारणा केली. तहसील कार्यालयातही गेलो. तेथेही तारतम्य दिसून आले नाही. त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला.अमोल देशमुख,नगरसेवक.