आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting Machine Security Issue At Yavatmal, Divya Marathi

ईव्हीएमना तिहेरी सुरक्षा कडे, स्ट्रॉंग रूमच्या टेहळणीसाठी उभारले मचान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होईपर्यंतच्या काळात ईव्हीएम दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. या स्ट्राँगरुमच्या सभोवताली सुरक्षेचे तीन कडे तयार करण्यात आले असून त्यासाठी केंद्र आणि राज्य राखीव दलाच्या जवानांसह जिल्हा पोलिसांचा चोख पहारा ठेवण्यात आला आहे.
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. दरम्यान, मतदारसंघामधील 2009 मतदान केंद्रावरील सर्व मतदान यंत्रे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत एकत्रित करण्यात आली. त्यानंतर ही सर्व मतदान यंत्रे दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण सहा गोदामे आहेत. त्यापैक ी दोन गोदामात स्ट्राँग रुम तयार करण्यात आले आहेत. उर्वरीत चार गोदामात 16 मे रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे. इव्हीएम ठेवण्यात आलेली गोदामे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले आणि इतर अधिकारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष सील करण्यात आली. 16 मे रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार असल्याने त्या दिवशीच आता हे सील उघडण्यात येणार आहे. स्ट्राँग रुमच्या सभोवताली सुरक्षा यंत्रणेचे कडे उभारण्यात आले आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीन कड्यांपैकी स्ट्राँगरुमपासून पहिल्या कड्यात केंद्रीय राखीव दलाच्या सशस्त्र महिला जवान आहेत. त्यानंतर दुसर्‍या कड्यात राज्य राखीव दलाचे जवान, त्यानंतर तिसर्‍या आणि बाहेरच्या कड्यात जिल्हा पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.