आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळा गोंधळ: निलंबन, व्हीआरएसमुळे आता सारी भिस्त कंत्राटी अधिकाऱ्यांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- काही अधिकाऱ्यांचे निलंबन तर काहींनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतल्यामुळे महापालिकेसमोर भूतो भविष्यती संकट उभे ठाकले आहे. या श्रृंखलेत मनपाने नविृत्त सात अधिकाऱ्यांची भरती केली असून मनपाच्या बांधकाम, प्रकाश एलबीटी विभागाचा कारभार त्यांच्या खांद्यावर सोपवला आहे.
चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनपाच्या अंतर्गत व्यवस्थापनात अनेक चढ-उतार आले. त्यामुळे साफसफाई यंत्रणेचे प्रमुख (आरोग्य अधिकारी) डॉ. देवेंद्र गुल्हाने, प्रकाश विभागाचे उपअभियंता अशोक देशमुख, पशुशल्यचिकित्सक डॉ. सुधीर गावंडे या तीन अधिकाऱ्यांसह क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपीक प्रशांत पवार यांना वेगवेगळ्या कारणांमुळे नलिंबीत व्हावे लागले.
याच काळात बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एम. देशमुख यांनी स्वेच्छानविृत्ती (व्हीआरएस) तर शहर अभियंता ज्ञानंेद्र मेश्राम यांनी दीर्घ रजा घेतली. परिणामी आरोग्य, प्रकाश (वदि्युत), बांधकाम, पशुशल्यचिकीत्सा, क्रीडा इतर विभागांची दैनंदनि कामे प्रभावीत झाली. ती निस्तारण्यासाठी आयुक्तांनी वेगवेगळ्या विभागातील नविृत्त अधिकाऱ्यांच्या भरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार बांधकाम विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून जीवन सदार बी. एम. मंडाळे आणि अतिरिक्त उपअभियंता म्हणून एस.पी. देशमुख नंदकिशोर राऊत या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
विद्युत विभागात निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता म्हणून प्रकाश वानखडे उपअभियंता म्हणून वलिास जामठीकर यांना नियुक्त करण्यात आले. तर एलबीटी विभागाचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून नविृत्त सहायक आयुक्त अरविंद पाटील यांनाही नियुक्ती देण्यात आली. यापैकी जामठीकर यांना तीन महिण्यांसाठी तर इतर सर्व अधिकाऱ्यांना सहा महिण्यांसाठीचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. कायदेशीर तरतुदीनुसार या सर्वांना त्यांच्या नविृत्तीवेतनाएवढे मानधन दिले जाणार असून तेवढ्या रकमेवर काम करण्याची तयारी संबंधितांनी दर्शवलिेली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जामठीकरांचा नवा कार्यकाळ १० दिवसांवर... कोण-कोणते आहेत नवे अधिकारी...
बातम्या आणखी आहेत...