आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायड्रोलिक ऑटोला गळती; टेंभूरखेडा रस्त्याचा 'कचरा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- शहरापासून जवळच असलेल्या टेंभूरखेडा या रस्त्यावर वरुड पालिकेचा कचरा डेपो आहे. शहरातील कचरा हायड्रोलीक ऑटोने कचरा डेपोत टाकला जातोय, असे वाटत जरी असले तरी मात्र वास्तव्य वेगळेच आहे. या हायड्रोलीक ऑटोतील कचरा शहराच्या बाहेर निघाल्या बरोबर कचरा डेपोत पोहोचतच नाही. त्यातील बहुतांश कचरा हा नेताना टेंभूरखेडा रस्तावरच पडत असल्यामुळे या रस्त्याला कचरा डेपोच स्वरूप आल्याचे दिसून येते.
गेल्या चार पाच वर्षांपासून वरुड शहरात विषाणुजन्य साथीच्या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याला आळा बसवण्यासाठी तालुक्यात पंचायत समिती, नगरपालिका, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग या सर्वांनी मिळून स्वच्छता मोहीम राबवली. यात नगरपालिका कुठेही कमी पडू नये म्हणून ३० एप्रिलला नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शहरात महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली. परंतु, घर स्वच्छ बाहेर घाण अशी याप्रमाणे टेंभूरखेडा या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावरून दिसून येत आहे. एकीकडे कचरा सफाई करून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला असा गवगवा पालिका करत असली तरी टेंभूरखेडा मार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे आरोग्य मात्र या कचऱ्यामुळे धोक्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या पाच वर्षांपासून वरूड-टेंभूरखेडा या रस्तावर कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या हायड्रोनीक ऑटोला अद्यापही आरटीओ पासिंग नाही.
अशावेळी जर या ऑटोने एखादा अपघात झाला, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे. हायड्रोलीक ऑटोतून कचरा नेताना रस्त्यावरच पडत असल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण होत अाहे. याच रस्तावर तीर्थक्षेत्र गव्हाणकुंड, आयटीआय महाविद्यालय, शाळा कॉलेजही आहे. त्यामुळे या रस्तावर मोठ्याप्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. हायड्रोलीक ऑटोतील सांडणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कचरा रस्त्यावरच सांडतोय ही म्हणजे गंभीर बाब
- शहरातील कचरा नेताना टेंभूरखेडा रस्तावर काच , कचरा पडलेले राहतो. यामुळे वाहनचालकांनी दुर्गंधीतून मार्गाक्रमण करावे लागते. आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. त्यामुळे याचा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारणार असल्यात येईल.
देवेंद्र भुयार, जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना.
या प्रकरणाची लवकरच चौकशी करणार
- शहरातील कचरा हा कचरा डेपोतच गेला पाहिजे. तो रस्ताने सांडता कामा नये. जर कचरा वाहून नेणाऱ्या हायड्रोलीक ऑटोतील कचरा खाली रस्तावर सांडत असले, तर त्याची प्रथम चौकशी करण्यात येईल.
विजय लोहकरे, मुख्याधिकारी.
वरुड शहरातील घाण टेंभूरखेड्याच्या माथी
- वरुड शहरातील कचरा डेपो टेंभूरखेडा रस्तावर नको होता. कारण हा रस्ता वर्दळीचा आहे. कचरा डेपो रस्तावर असला तरी, या रस्तावर कचरा सांडणार नाही सर्वसामान्यांना याचा त्रास होणार नाही याची दखल पालिकेने घ्यायला हवी.
अशोक पंडागळे, सरपंच, टेंभुरखेडा.