आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग साइटवर पोलिसांचा "वॉच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मागील काही महिन्यांत सायबर क्राइमच्या घटनांमध्ये झालेली सरासरी वाढ आणि आक्षेपार्ह क्लिप फोटोमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा घटनांना आळा बसावा, या उद्देशाने पोलिस महासंचालकांनी सोशल नेटवर्किंग घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या सोशल नेटवर्किंग साइटवर ‘वॉच' ठेवणे सुरू केले आहे. धार्मिक, जातीय भावना दुखावतील, असे छायाचित्र, व्हिडिओ क्लिप, अश्लील छायाचित्रे, मजकूर पोस्ट करणे, तो लाइक करणे, शेअर करणे, त्यावर कमेंट करणाऱ्यांसह हा मजकूर फॉरवर्ड करणाऱ्यांवर आता लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर संवेदनशील माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांसह ती शेअर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. या गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्यास कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा
सोशलमीडियावर प्रसिद्ध होणा-या आक्षेपार्ह पोस्ट क्लिपिंगवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यासाठी सायबर क्राइम विभाग अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे. सायबर क्राइमचा गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा होऊ शकते. सोमनाथघार्गे, पोलिसउपायुक्त.
मुलांच्या व्‍हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोण आहेत; रोज कोणत्या मजकुराची देवाणघेवाण होते याची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. मुले काय करतात, हे पालक कधी तपासत नाहीत. मुलांच्या मोबाइल वापराकडे लक्ष देत विकृत मनोवृत्तीला आळा घातल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील.
‘फॉरवर्ड’ करताना घ्या काळजी
बदनामीकारक,धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा ‘मेसेज’ जर आला असेल आणि तोच ‘मेसेज’ इतरांना पाठवला, तर सायबर क्राइमनुसार हा गुन्हा ठरतो. त्यामुळे मेसेज पाठवणारा आणि तोच मेसेज आणखी इतरांना पाठवणारा दोषी असताे. त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक तरुण मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मजकूर साठवून ठेवत असतात.