आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकरांचा गुरुवारी ‘ड्राय डे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सिंभोरा (मोर्शी) येथील पंप हाउसवर दुरुस्ती करावयाची असल्याने गुरुवारी (11 ऑक्टोबर) अमरावती व बडनेरा शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तशी सूचना दिली असून दोन्ही वेळेचा पुरवठा होणार नसल्याचे म्हटले आहे.

अमरावती शहर व बडनेरा येथील नागरिकांना मोर्शी तालुक्यातील सिंभोर्‍याच्या अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे यावर्षी धरणातील जलसंचयात नेहमी घट-वाढ होत राहिली. शिवाय धरणात शिरलेले पुराचे पाणी गढूळ व गाळयुक्त असल्याने पंप हाऊसमध्ये बिघाडही झाला. परिणामी मध्यंतरी काही दिवस स्वच्छ व निर्मळ पाणीही पुरवले गेले नव्हते. या कारणामुळेच दुरुस्ती कार्य हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, येथील जलशुद्धीकरण केंद्रात असलेले पाणी दोन वेळसाठी पुरेसे असल्याने बुधवारी सकाळी व सायंकाळी ते अमरावतीकरांना दिले जाईल. गुरुवारी मात्र अमरावती व बडनेरावासीयांना पाणी मिळणार नाही. मजीप्रा कार्यकारी अभियंता यांच्या म्हणण्यानुसार, सिंभोरा येथील पंप हाउसवर मोठा बिघाड झाला आहे. तो दुरुस्त करण्यासाठी दिवसभराचा कालखंड लागेल.