आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गढूळ पाणीपुरवठ्याबाबत मनसे आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देताना संतोष बंद्रेंसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते. )
अमरावती-मागीलकाही दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनमधून पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यासंदर्भात दिव्य मराठीने नागरिकांच्या या समस्येबाबत ""शहरात येतेय गढूळ पाणी' शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. दिव्यमराठीने लावून धरलेल्या या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून यासंदर्भात मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले.
दूषित गढूळ पाणी पुरवठा थांबवून नागरिकांना चांगले पाणी पुरविण्यात यावे. या प्रकरणाची तत्काळ दखल घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना भूषण फरतोडे, तुषार तायडे, धीरज तायडे, बबलू आठवले, पवन दळवी, रोशन शिंदे, चंदन गव्हाणे, सुरेश चव्हाण, हिमांशू मिसे, अभिजीत सुरवाडे, भूषण गोबरे, शिवा वाडे, पवन राजूरकर आदी उपस्थित होते.