आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरूस्ती : दोन दिवस राहणार १५६ गावांचा पाणीपुरवठा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहानूर प्रकल्पावरील जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अंजनगावसुर्जी, दर्यापूर भातकुली तालुक्यांतील १५६ गावांचा दर्यापूर अंजनगावसुर्जी शहरांचा पाणीपुरवठा डिसेंबर रोजी बंद राहणार आहे.
अंजनगावसुर्जी नजीकच्या शहानूर प्रकल्पावरील जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांची यादरम्यान दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे अंजनगावसुर्जी, दर्यापूर भातकुली तालुक्यातील १५६ गावांना दोन दिवस पाणी मिळणार नसल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आली आहे. दरवर्षी प्रकल्पातील जलवाहिन्यांची तसेच जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती केली जाते. या अंतर्गत दोन दिवस ७९ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर रोजी दुपारी चारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, डिसेंबरपासून मात्र सर्वच गावांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती दर्यापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सतीश बक्षी यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी दोन दिवसांकरिता सहकार्य करण्याचे आवाहन बक्षी यांनी केले आहे.