आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या नासाडीत अमरावती टॉपर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पाण्याच्या नासाडीबाबत अमरावती हे पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतून अव्वल स्थानी आहे. जलतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे.अध्ययनासाठी जलतज्ज्ञांनी अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशीम, खामगाव, बुलडाणा, अचलपूर, अंजनगावसुर्जी, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, वरुड, धारणी, चिखलदरा, बाळापूर येथे पाहणी केली. एकूण पाहणीनंतर तज्ज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत.

इतर शहरांच्या तुलनेत अमरावतीत नियमित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील लोक पाणी वापराबद्दल बिनधास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अकोला, खामगाव, बुलडाणा येथे चार ते पाच दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. अकोट, तेल्हारा, धारणी भागात पायपीट करून पाणी आणावे लागते.

नासाडी 30 टक्के
पाणीपुरवठय़ाच्या एकूण प्रमाणापैकी 30 टक्केपाणी वाया जाते. ग्रामीण भागात तर हे प्रमाण गंभीर आहे. शहरातील प्रमाणही चिंताजनक आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा. तसे न झाल्यास भीषण संकट भेडसावू शकते. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा