आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती वाया जाते पाणी, कुणाच्या ना ध्यानी मनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- 65 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणी येते. जलसंपदा विभागापासून जीवन प्राधिकरण विभागापर्यंत (मजीप्रा) सार्‍यांना यासाठी दरवर्षी सुमारे पाच ते सात कोटी रुपयांचा भार सोसावा लागतो. एका माणसासाठी लागणार्‍या पाण्याची सरासरी काढून अमरावती शहरातील 72 हजार नळधारकांना पाणी दिले जाते. मात्र, कोण, किती पाणी वाया घालवतेय, याचे ऑडिट करण्याची पद्धतच मुळात अस्तित्वात नाही.

जलसंपदा विभाग धरणातील पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देते. यासाठी मजीप्राकडून बिलाची आकारणी केली जाते. जीवन प्राधिकरण विभाग शहरातील नळधारकांना पाणी पुरवते. त्यासाठी ग्राहकांकडून बिल आकारले जाते. परंतु, धरणापासून लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारे पाणी कुठे, कसे, किती प्रमाणात वाया जातेय, याची आजपर्यंत कधीही कुठेही नोंद झालेली नाही.

72 हजार नळधारकांपैकी कोणत्या परिसरात सर्वाधिक नासाडी होते, कशासाठी होते, याचे सर्वेक्षण आजपर्यंत अधिकृतपणे कुणीही केलेले नाही. ‘दिव्य मराठी’ने जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका, जलसंवर्धनावर कार्य करणार्‍या काही व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, जलस्वराज सारख्या प्रकल्पांवर काम केलेल्या काही विषयतज्ज्ञांना प्रश्नावली दिली.