आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली पावसाने हवामानात बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भातील हवामानात व्यापक बदल झाला आहे. त्याचा परिणाम अमरावतीतही बघायला मिळाला. शुक्रवारी (दि. 29) सायंकाळनंतर हवामानात झपाट्याने बदल झाल्याचा अनुभव अमरावतीकरांनी घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

शहरात सुमारे 15 मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या आणि पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुन्हा तुरळक पावसाने हजेरी लावली. हवामानातील बदलांमुळे शहरातील सापेक्ष आद्र्रतेतही बदलाची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात गेल्या आठवडाभरात चांगलीच वाढ झाली. 28 अंश सेल्सियसपर्यंत घसरलेले कमाल तापमान पुन्हा 30 ते 32 अंश सेल्सियसपर्यंत चढले आहे. किमान तापमान 16 ते 14 अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते. त्यातही वाढ झाली आहे. किमान तापमानाचा पाराही 15 ते 17 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.