आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जन-धन’ म्हणजे काय रे भाऊ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतातील प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येकाला राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जन-धन योजनेचा ज्वर सध्या सर्वत्र पसरला आहे. दुसरीकडे, माहितीची अपूर्ण उपलब्धता खाती सुरू करण्यासाठी बहुतेक बँकांचा असहकार यामुळे या योजनेच्या खात्यांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. पूर्वघोिषत वेळापत्रकानुसार या योजनेची खाती २६ जानेवारीच्या आतच उघडायची असल्याने आता केवळ वीसच दिवस शिल्‍लक आहेत.

घरगुती वापराचा गॅस, रासायनिक खते, घरकुल शौचालये, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शासनातर्फे वेळोवेळी दिली जाणारी अनुदाने थेट संबंधितांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रत्येकाचे बँक खाते असणे आवश्यक आहे. हे खाते जन-धन योजनेत उघडल्यास त्यांना बँकिंगशिवाय इतरही काही सुविधा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे साधी खाती उघडण्यापेक्षा जन-धनच्या खात्यांना नागरिकांची प्राथमिकता आहे. मात्र, बहुतेक बँका सहकार्य करण्यास तयार नसल्यामुळे या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

कशीआहे जन-धन योजना ? : यायोजनेत उघडली जाणारी खाती आणि सामान्य खाती यासाठीची प्रक्रिया फारशी वेगळी नाही. मात्र, जन-धनच्या खात्यांना काही प्रमाणात जादा सवलती आहेत. त्यांपैकी पहिली सवलत अशी की या सर्व खातेदारांना एक लाख रुपयांच्या िवम्याचे कवच आहे. अपघात झाल्यास संबंधितांना विमा कंपनीतर्फे ही रक्कम दिली जाणार आहे. दुसरी सवलत अशी, की हे खाते उघडताना कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागणार नाही.

भारतीयबनावटीचे पहिले कार्ड : एटीएमसदृश‘रुपे कार्ड’ हे भारतीय बनावटीचे पहिले कार्ड आहे. खातेदारांना पैसे काढताना त्याचा वापर करता येईल. सध्या वापरात असलेले सर्व प्रकारचे एटीएम कार्ड हे विदेशी बनावटीचे आहे.

रुपे कार्ड मुळे भारतातही एटीएम तयार होतात, हे पुढे आले असून भारतीय चलनाचा मोनोग्राम त्यावर कोरला गेला आहे. १८ ते ५९ वर्षे वय असणारा व्यक्ती या खात्यासाठी पात्र असून त्या सर्वांना हे एटीएम दिले जाईल.

दुसऱ्याखात्याची गरज नाही : जन-धनयोजनेची खाती केवळ राष्ट्रीयीकृत बँकेतच उघडायची आहेत. एखाद्या व्यक्तीचे आधीच खाते असेल तर संबंधिताला दुसरे उघडण्याची गरज नाही. असलेले खाते जन-धनशी जोडण्यासाठीचा साधा अर्ज दिल्यानंतरही ते जोडले जाऊ शकते. मात्र, त्या खात्याला जन-धनच्या अटी लागू होतील, असे बँकांचे म्हणणे आहे.

गरिबांसाठीचीच योजना
-यायोजनेत एकावेळी ५० हजार रुपयांच्या आतील व्यवहार करणेच शक्य असून, वर्षभरातील व्यवहार एक लाखापेक्षा अधिक होता कामा नये, असे म्हटले आहे. त्यामुळे ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच आहे, हे स्पष्ट होते. आमच्या बँकेत त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला असून आतापर्यंत ३,०२१ खाती उघडली आहेत. सुधांशूभूषण,मुख्य व्यवस्थापक,पंजाब नॅशनल बँक, अमरावती.
एक लाखाचे ‘सीलिंग’
जन-धनयोजनेच्या खात्यांना वार्षिक एक लाख रुपयांचे ‘सीिलंग’ आहे. अर्थात या खात्यातील वर्षभराचा व्यवहार एक लाख रुपयांपेक्षा जास्त होता कामा नये. हा व्यवहार ८० हजारांवर पोहोचल्यानंतर संबंधित खातेदारास तशी सूचना दिली जाईल. दुसऱ्या एका अटीनुसार या खात्यात एकाचवेळी ५० हजार रुपये जमा करणे किंवा काढणे असे करता येणार नाही. दर ४५ दिवसांत या खात्यात एक व्यवहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.