आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Who Is New Chief For Public Relations In Shiv Sena?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे नवीन संपर्कप्रमुख कोण?, नेत्यांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: संजय राठोड
अमरावती - गेल्याविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत झालेल्या दारुण पराभवामुळे शिवसेनेत उफाळून आलेली अंतर्गत गटबाजी बाजूला सारून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नुकतेच जिल्हा दौ-यावर येऊन गेलेले रामदास कदम यांनी जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीचा तपशील मातोश्रीवर मांडला असून, दोषींवर आता कोणती कारवाई होते, याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपदाची धुरा खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडेच कायम राहणार, की नवीन संपर्क प्रमुख मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड किंवा रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये आहे. विदर्भामध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना मजबूत असलेल्या मतदारसंघातदेखील भारतीय जनता पक्षाला सरशी मिळाली. विदर्भात झालेली पिछेहाट शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून, याबाबत वरिष्ठ स्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिवसेनेचे महाराष्ट्र सरकारमधील पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री मागील आठवड्यात विदर्भात होते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभानिहाय आढावा शिवसेनेच्या या मंत्र्यांकडून घेण्यात आला. पर्यावरणमंत्री रामदास कदम तसेच उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्याकडून पराभवाचे आत्मचिंतन केले जाणार आहे.

राठोड यांच्याकडे प. विदर्भाच्या जबाबदारीची चर्चा
शिवसेनेचेविदर्भातील एकमेव मंत्री असलेले यवतमाळचे संजय राठोड यांच्याकडे पश्चिम विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम विदर्भ सहसंपर्कप्रमुख आधीच आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून कोणाची वर्णी लागेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.