आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीनेच केला चार प्रकारे "कोल्ड ब्लडेड मर्डर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिच्‍यावरिवश्वास टाकला, त्या पत्नीनेच घात केला. आधी जेवणातून झोपेच्या गोळ्यांचा चुरा दिला. नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यानंतरही तो जिवंत राहू नये म्हणून अंगावर रॉकेल टाकून जाळले. एवढ्यावरच हे कौर्यकृत्य थांबले नाही, तर जळालेला मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीच्या पाण्यात फेकून दिला. एखाद्या सराईत मारेकऱ्याच्याही अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेवती गावात घडली असून, शहर पोलिसांनी काही तासांतच या घटनेचा पर्दाफाश केला आहे.

दोन िदवसांपूर्वी वलगाव माहुरे ते मासोद मार्गावरील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पाहताच पोलिस अधिकारी ही हत्याच होती, यावर ठाम झाले होते. अनेक तासांच्या अथक परिश्रमांनंतर पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली. शेवती येथील गंगाधर मारोतराव ठेले असे मृतकाने नाव असल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशीनंतर गंगाधर यांच्या पत्नी सीमा ठेले आणि रावसाहेब राजूरकर नामक व्यक्तीने संगनमताने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना नांदगाव पोलिसांनी अटक केली.

सामूहिक तपासाचे यश
^नांदगावपेठ, गुन्हे शाखा, सायबर सेल अशा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे तपासात यश आले. आमची सर्व पथकं प्रकरणाचा पूर्ण छडा लागेस्तोवर तपास करीतच होते. त्यातून सीमा रावसाहेब याला अटक करण्यात आली. रियाजुद्दीनदेशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा).