आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहराजवळ पोहराच्या जंगलात दिसताहेत वन्यजीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरापासून अवघ्या काही किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या पोहराच्या जंगलातही आता वन्यजीव मोठ्या संख्येने दिसायला लागले आहेत. मेळघाटच्या जंगलात असलेले सर्वच प्रकारचे वन्यजीव पोहराच्या जंगलात आता बघायला मिळतात.

या भागात तृणभक्षी प्राण्यांची संख्याही वाढतेय. त्यामुळे मेळघाटच्या धर्तीवरच शहरानजीक असलेले पोहराचे जंगल वन्यजिवांच्या दृष्टीने सुरक्षीत क्षेत्र निर्माण झाले आहे असे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी सांगितले. पोर्णिमेच्या रात्री संपुर्ण चंद्र प्रकाशात पोहराच्या जंगलातही वन्यजिवांंचे निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अद्याप विस्तृत अहवाल तयार व्हायचा आहे. याबाबत निनू सोमराज यांनी सांगितले की, पोहराच्या जंगलामध्ये एक पट्टेदार वाघिण आहे. या व्यतिरीक्त बिबट, चितळ, सांबर, बारसिंबा, मसन्या उद, जंगली डुक्कर, मोर, लांडोर, निलगाय हे वन्यप्राणी आहेत. जंगलात बिबट आणि वाघिण असले तरी त्यांचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

तृणभक्षी प्राणी मुबलक प्रमाणात
वाघबिबट अथवा जंगली प्राण्याचे खाद्य म्हणजे तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात पोहराच्या जंगलात आढळतात. यामुळे बिबटाला या जंगलात खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.जंगलात खाद्य असले की बीबट आणि वाघासारखे वन्यजिवांची वाढ होण्यास मदत होते.

शहराजवळ होऊ शकते वनपर्यटन केंद्र
अमरावतीशहरापासून पंधरा ते वीस किलोमिटरच्या हद्दीत पोहराचे जंगल आहे. या भागात वन्यजिवांचे दर्शन सुलभरीत्या होत असल्याने वन पर्यटन केन्द्र या ठिकाणी होऊ शकते. शहरालगत असलेल्या वडाळी परिसरापासून ते इंदला, चिरोडी आणि पोहराच्या जंगलात हे वन्यप्राणी दृष्टीक्षेपात पडतात. या भागात नैसर्गिक वनसंपदाही बहरली आहे.