आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Birds News In Marathi, Environment, Death, Divya Marathi

पाण्यात विष कालवून सात मोरांची करण्‍यात आली शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जलप्रवाहात विषारी द्रव्य टाकून सात मोरांसह नऊ पक्ष्यांची शिकार करण्यात आली आहे. पोहरा संरक्षित वनक्षेत्रात शिकारीची ही भीषण घटना मंगळवारी, 8 एप्रिलला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.


जंगलात गस्त घालत असलेल्या वनविभागाच्या पथकाला हा प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आला. पोहरा-मालखेड संरक्षित वनक्षेत्रात चिरोडी परिसर आहे. तेथून जवळच एक जलप्रवाह आहे. त्यामुळे येथे पक्ष्यांचा मोठय़ा संख्येने वावर असतो. परिणामी, शिकार्‍यांची नजरही या जलप्रवाहाच्या आसपास होती. संधीचा फायदा घेत शिकार्‍यांनी जलप्रवाहात विषारी द्रव्य कालवले. अमरावतीचे तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने घशाला कोरड पडलेल्या मोरांचे व इतर काही पक्ष्यांचे थवे पाणवठय़ावर विसावले; परंतु हे पाणी पिल्यानंतर तब्बल सात मोर, एक पॉन्ड हेरॉन, एक क्रोफिजन्ट, अशा एकूण नऊ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाने पंचनामा आणि शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिकारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. सर्व पक्ष्यांचे व्हिसेरा लवकरच प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या संरक्षित वनक्षेत्राच्या आसपास लोकवस्ती आहे. तेथूनच मांसाहार करण्याचा बेत असणार्‍यांनी ही शिकार केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.