आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ड्राय डे’ला आठ लाखांचे मद्य जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय डे’ला दारूविक्रीवर बंदी असते. मात्र, अकोला महामार्गावर हॉटेल तंदुरी नाइट्स अँड वाइन बारमध्ये दारूविक्री सुरू होती. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने धाड टाकून तब्बल आठ लाख दोन हजार 18 रुपयांच्या दारूसह 32 हजार 650 रुपयांची रोकड जप्त केली. हॉटेल संचालकासह चौघा मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
महामार्गावरील लोणी गावानजीक महेंद्रपालसिंग हरबनसिंग नंदा आणि मंदिरसिंग हरबनसिंग नंदा यांच्या मालकीचे तंदुरी नाइट्स हॉटेल आणि वाइन बार आहे. शुक्रवारी (दि. 1) दारूविक्रीवर बंदी असतानाही हॉटेलमध्ये ग्राहकांना पुरवली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाक ली असता, हॉटेलमध्ये चेतन राजाराम देशमुख, अभिजित राजाराम देशमुख, अनुपम राजाराम देशमुख (तिघेही रा. नागपूर) आणि आशुतोष संतोष देशमुख (रा. मोर्शी हे विनापरवाना मद्य प्राशन करीत होते. पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली आणि विविध कंपन्यांची 7005 बॉटल दारू जप्त केली. त्याची किंमत आठ लाख दोन हजार 18 रुपये आहे. 32 हजार 650 रुपये रोखदेखील जप्त करण्यात आले. हॉटेल संचालक आणि विनापरवाना मद्य प्राशन करणार्‍या चौघांविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक जिल्हा पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, सहायक पोलिस निरीक्षक किरण वानखडे, लोणीचे ठाणेदार सतीश उपाध्याय, सचिन मिर्शा, प्रवीण देशमुख, शकील चव्हाण, सुधीर पांडे, दिनेश राठोड, प्रदीप काळबांडे, संजय तायडे यांनी केली.