आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा घसरू लागला; गारवा वाढू लागला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्याने विदर्भातील थंडीत वाढ होत आहे. अमरावतीचे तापमान 14.4 अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. एरवी हिवाळा सुरू झाल्यापासूनचे आतापर्यंचे तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान होते.

मागील वर्षी आजच्याच दिवशीचे तापमान 15 अंश सेल्सिअस होते, अशी हवामान खात्याची नोंद आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षी 10 ऑक्टोबरनंतरच खर्‍या हिवाळ्याची सुरुवात झाली. नोव्हेंबर सुरू झाल्यापासून वातावरणात काहीसा गारवा आला. त्यामुळे एक नोव्हेंबरपासूनच्या नोंदी हवामान खात्याने अगदी बारकाईने घेतल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेतही ते 0.8 अंश सेल्सिअसने कमी आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार 2011 ते 2013 या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा हिवाळा अजूनही फारसा थंड नाही. पहिल्या 11 दिवसांतील तापमानावरून हे बोलले जात आहे; तापमान कमी झाल्याने वातावरणात गारवा शिरला आहे. याचे संकेत मिळाले आहेत. थंडीमुळे पिकांचे पोषण योग्यरीत्या होते. शिवाय वातावरणाचे ऋतुचक्रही व्यवस्थित चालते, अशी माहिती जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी खोडनकर यांनी दिली. शहरातील आद्र्रता 48 टक्क्यांवर आहे. हवेचा दाब 1015 मिलिबार होता. वायुवेग पाच किलोमीटर ताशी होता. वायूची दिशा ईशान्य होती. अल्ट्राव्हायोलेटची तीव्रता मात्र सहा यूव्ही कायम होती.