आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Cantainer 44 New Two Wheeler Burned, Incident Happened At Amravati Yavatmal Road

कंटेनरसह 44 नव्या कोर्‍या दुचाकी जळून खाक, अमरावती-यवतमाळ मार्गावर थरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर रविवारी सायंकाळी नव्या कोर्‍या दुचाकी घेऊन जाणार्‍या कंटनेरला अचानकपणे आग लागली. यामध्ये 44 दुचाकींसह कंटेनर जळून कोळसा झाला. आगीचा थरार जवळपास दीड तास सुरू होता.
अमरावतीकडून यवतमाळच्या दिशेने जाणार्‍या दहा चाकांच्या कंटेनरमध्ये (एचआर 38 क्यू 2155) एका कंपनीच्या 44 दुचाकी होत्या. या दुचाकी हरियाणाच्या गुडगाव येथून जबलपूरला जात असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. हा कंटेनर यवतमाळ मार्गावरील दाभा गावानजीक पोहोचताच मार्गातून गेलेल्या एका विद्युत तारांसोबत कंटेनरचा स्पर्श झाला. या वेळी घर्षणामुळे कंटनेरने पेट घेतला. क्षणातच आग पसरली आणि नवीन 44 दुचाकी जळून खाक झाल्या. त्या दुचाकींची किंमत सुमारे 24 लाख 46 हजार असल्याचे समजते. आग लागल्यानंतर कंटेनरचालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले होते. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळ गाठले, त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग प्रचंड वाढली होती. त्या वेळी बडनेरा पोलिस आणि अग्निशमन विभागाला ही माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तीन बंब पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या वेळी अमरावती-यवतमाळ या मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. कंटेनरच्या आगीमुळे नव्हते; त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड्स उभे करून काही वेळ वाहतूक थांबवून ठेवली होती, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे.
मोठा अनर्थ टळला
कंटेनरला अचानकपणे आग लागली. संपूर्ण कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दुचाकींचे टायरसुद्धा पेटले होते. या वेळी कंटेनरच्या डिझेल टँकमध्ये शेकडो लिटर डिझेल होते. सुदैवाने डिझेल टँकला क्षती पोहोचली नाही; अन्यथा स्फोटसुद्धा होऊन प्रचंड हानी झाली असती, असे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले.