आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Teacher Rural Students Deprive Computer Education

शिक्षक नसल्याने ग्रामीण विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - तालुक्यात सर्व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व शाळांना संगणक दिले. परंतु संगणक प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक दिल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी संगणक ज्ञानापासून वंचित राहत आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२१ शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ग्रामिण भागातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये संगणक दिले आहेत. मात्र संगणकासोबतच संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक मात्र दिले नाही. परिणामी मोठा गाजावाजा करून सर्व शिक्षा अभियानाने सुरू केलेल्या संगणक प्रशिक्षण उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय आहे हेच माहित नसते. तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळेत अजूनही विज पुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही. ज्या प्राथमिक शाळेत विज पुरवठा आहे त्या ठिकाणी पंखाही फिरत नाही एवढे कमी व्होल्टेज वीजेचे असते. अशा शाळेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संगणक देऊन फायदा नाही. तर अगोदर शाळांना स्वंयपूर्ण करून नंतर संगणक त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची भरती करावी अशी पालकांची शिक्षण विभागाकडे केली आहे.

केवळ दोन शाळांना संगणक वाटप : नविनशैक्षणिक सत्र नुकतेच सुरू झाले आहे. या चालु सत्रामध्ये तरी ज्या प्राथमिक शाळांना अद्याप संगणक मिळाले नाही, अशा शाळांना संगणक पुरवण्याची मागणी होत आहे.

संगणक संचच नाहीत
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संगणकाची मागणी पुणे शिक्षण विभागाकडे पंचायत समितीने केली आहे. त्याचा पाठपुरावासुद्धा सुरू आहे. आमच्या कार्यालयात एकच जुन्या पिढीचे संगणक आहे. ज्योती पांडे, गटशिक्षणाधिकारी, पुसद