आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खोटी तक्रार; महिलेवर कारवाई, सिटी कोतवाली पोलिसांची केली दिशाभूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कांचन पांडे, सहायक पोलिस निरीक्षक.)
अमरावती- खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एका ५० वर्षीय महिलेवर कारवाई केली. अंजना रमेश कांबे (रा. भानखेडा) असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे.
अंजना कांबे या २५ मे रोजी सव्वा चार वाजता सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आल्या. राजकमल चौकातील यशोदा दूध डेअरीजवळ भरदुपारी साडेतीन वाजता दोन अज्ञात युवकांनी चाकूचा धाक दाखवून तोंड दाबून हातातील पैशांची थैली जबरीने हिसकावून पळ काढल्याची तक्रार दिली होती.
या लूटमारीत ४० हजार रुपये रोख, १५ हजार रुपयांच्या कानातील सोन्याच्या रिंग्ज हजार किमतीच्या दोन चांदीच्या पाटल्या, असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी दोन अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भरदुपारी राजकमल चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी जबरी चोरी झालीच कशी, हे पोलिसांना खटकत होते. पोलिसांनी तपास सुरू केला असता, हे सगळं बनावट असल्याचे जाणवले. महिलेची कसून चौकशी सुरू केली असता, पोलिसांना खरे कारण समजले. पोलिसी खाक्या दिसताच अंजना पटापट बोलू लागल्या. अंजना त्यांचा अल्पवयीन मुलगा हे दोघेही अमरावतीत आले होते.
अंजनाने आपल्या मुलाला ४० हजार रुपये मावशीला देऊन ये, असे सांगितले. त्यावरून अर्जुन हा पैसे घेऊन त्याची मावशी बसंतीकडे गेला. त्याने ते पैसे मावशीला दिल्याची कबुली अंजनाने पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी महिलेने दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे सांगितले.
अमरावती खोटीतक्रार दिल्यावरून दोघांनी एका ४२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला चढवल्याची घटना रविवारी लालखडी परिसरात घडली. शेख वहीद शेख अजीज असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरापैकी एकाने वहीदच्या मांडीवर चाकू मारून जखमी केले, तर दुसऱ्याने डाव्या हातावर काठीने वार केला. याप्रकरणी जखमी वहीदने परिसरात राहणारे करीम शहा लुकमान शहा बादशहा यांच्याविरुद्ध नागपुरी गेट पोलिसांत तक्रार िदली. रहमत नगर येथे फिर्यादीची बहीण राहते. रविवारी रात्री तो आपल्या बहिणीकडे जात असताना लुकमान शहा याने फिर्यादीला तू माझी मद्यपान करून खोटी तक्रार का दिली, असे म्हणून खिशातून चाकू काढून त्याच्या मांडीवर मारून जखमी केले, तर बादशहा याने हातावर काठीने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींिवरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कारवाई होणारच
- ६३हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार या महिलेने सोमवारी दिली होती. भरदुपारी इतकी मोठी लूटमार, तेही वर्दळीच्या ठिकाणी झालीच कशी हे पचनी पडले नाही. त्यावरून कसून चौकशी केली असता सत्य पुढे आले. पोलिसांची दिशाभूल खोटी तक्रार दिल्याप्रकरणी महिलेवर कारवाई केली जाईल.
कांचन पांडे, सहायक पोलिस निरीक्षक.
बातम्या आणखी आहेत...