आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणरागिणींचा पुन्हा एल्गार, परिसरातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वडाळीपरिसरातील देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी परिसरातील महिलांचा वर्षभरापासून सुरू असलेला लढा रविवारी आणखी तीव्र झाला. परिसरातील दुकानाबाबत निर्णयासाठी २८डिसेंबरला दुसऱ्यांदा घेण्यात येणाऱ्या मतदानास आंदोलनकर्त्या महिलांनी विरोध केला आहे.दारूचे दुकान परिसरामध्ये नकोच, अशी हाक देत रविवारी (दि. १४) शेकडो आंदोलक महिलांनी एकत्रित येऊन रस्ता रोखला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस कुमक वडाळीत दाखल झाली आहे.
वडाळीतील मुख्य मार्गावर देशी दारूच्या बंद दुकानासमोर रविवारी दुपारी महिलांनी ठिय्या देऊन रस्ता जाम केला. त्यामुळे हा मार्ग जवळपास दोन तास वाहतुकीसाठी बंद होता. दुकान सुरूकिंवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये मतदान घेण्यात आले होते. त्या वेळी मतदानाचा फार्स झाल्यामुळे प्रशासनाने आता २८डिसेंबरला नव्याने मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान घेण्यात येऊ नये. कोणत्याही परिस्थितीमुध्ये दुकान बंद व्हायलाच हवे, अशी परिसरातील आंदोलक महिलांची भूमिका आहे.